24 August 2025
Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
आशिया कपच्या टीम इंडियाच्या जर्सीवर आता Dream11 चे नाव दिसणार नाही असे वृत्त आहे
Dream11 बाहेर गेली तर टीम इंडियाच्या जर्सीचे स्पॉन्सर कोण असणार ? हे नंतर कळेलच,परंतू ड्रीम 11 एका मॅचचे बीसीसीआयला किती पैसे देत होती हे माहिती आहे का ?
बीसीसीआय आणि Dream11 मध्ये जर्सी स्पॉन्सर करण्यासाठी साल 2023 मध्ये 358 कोटीचा करार झाला होता
त्या करारानुसार बीसीसीआयला Dream11 एका घरगुती मॅचचे 3 कोटी रुपये देत होती.
करारानुसार तर देशा बाहेरील मॅचचे Dream11 एक कोटी रुपये बीसीसीआयला देत होती
आशिया कपचे आयोजन 9 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. आता Dream11 जर बाहेर पडली असेल तर BCCI ला आता नवा प्रायोजक शोधावा लागणार आहे.
भारतीय बोर्ड असे करु शकेल का ? वा टीम इंडिया विना जर्सी स्पॉन्सर शिवायच आशिया कपमध्ये उतरणार हे पाहावे लागेल.
Dream11 सह अनेक गेमिंग App वर बंदी घालण्यात आली आहे.