आयसीसीने वनडे वर्ल्डकप बक्षिसाची रक्कम केली जाहीर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. पण सर्वांच्या नजरा वनडे वर्ल्डकप टिकल्या आहेत.

वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला आहे. 

वर्ल्डकप विजेत्या संघाला किती बक्षिसी रक्कम मिळेल. याची घोषणा आयसीसीने केली आहे. विजेत्या संघाला कोट्यवधी रुपये मिळतील. 

आयसीसीने वनडे वर्ल्डकपसाठी एकूण 82 कोटीहून अधिक रक्कम देण्याची घोषणा केली आहे. यात विजेता, उपविजेता, उपांत्य फेरीतील संघ, साखळी फेरीतील संघाचा समावेश आहे. 

आयसीसीनुसार, वनडे वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला एकूण 33 कोटी रुपये मिळतील. तर उपविजेत्या संघाला 17 कोटी मिळतील. 

उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर आणि साखळी फेरीतील संघाला 1 लाख अमेरिकन डॉलर मिळतील.

ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयासठी संघाला 40 हजार डॉलर मिळतील. म्हणजेच एकूण 10 मिलियन डॉलर्स बक्षिसात दिले जातील.

रक्तवाढीसाठी काय खावे? पाहा अधिक माहिती