CT 2025 : बांगलादेशकडूनही पाकिस्तान पराभूत, जाणून घ्या

27 फेब्रुवारी 2025

गतविजेता आणि यजमान पाकिस्तान चॅम्पिन्स ट्रॉफीतून बाहेर झालीच, तसेच शेजाऱ्यांनी बांगलादेशसमोरही गुडघे टेकले 

पाकिस्तान ए ग्रुपध्ये पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या आणि शेवटच्या स्थानी, बांगलादेश तिसऱ्या स्थानी

पाकिस्तानचा नेट रनरेट बांगलादेशपेक्षा वाईट, पाकिस्तानचा नेट रनरेट -1.087, तर बांगलादेशचा NRR -0.443

पाकिस्तान-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द झाला, रावळपिंडीत टॉसही होऊ शकला नाही

पाक-बांगलादेश दोघेही विजयी होण्यात अपयशी, दोघांनी पहिले 2 सामने गमावले, दोघांची स्थिती सारखीच, फरक नेट रनरेटचा

पाकिस्तानकडून यासह icc स्पर्धेतील पहिल्याच टप्प्यातून बाहेर होण्याची हॅटट्रिक, याआधी टी 20i वर्ल्ड कप2024 आणि odi wc 2023 मधून पहिल्याच फेरीतून बाहेर

पाकिस्तानकडून चॅम्पियन्स ट्रॉफीत एकालाही शतक करता आलं नाही. तर इतर 7 संघांतील फलंदाजाने शतक केलं