आयपीएल स्पर्धा गाजवणारा 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो?

29 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

शतकी खेळीनंतर 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची सर्वत्र चर्चा होत आहे. या खेळीसह त्याने इतिहास रचला आहे. 

14 वर्षांचा असताना वैभवने मोठं शिखर गाठलं आहे. गुजरात विरूद्धच्या सामन्यात 38 चेंडूत 101 धावा केल्या.

वैभव सूर्यवंशी क्रिकेटसोबत अभ्यासातही लक्ष देत आहे. याबाबत त्याच्या वडिलांनी एका मुलाखतीत खुलासा केला.

वैभव सूर्यवंशी बिहारच्या ताजपूरच्या डॉ. मुक्तेश्वर सिन्हा मॉडेस्टी शाळेत शिकतो. मिडिया रिपोर्टनुसार तो सध्या नववीला आहे. 

संजीव सूर्यवंशीने एका मुलाखतीत सांगितलं की, वैभव सकाळी उठून अभ्यास करतो. त्यानंतर क्रिकेटवर लक्ष्य केंद्रीत करतो.

वैभव सूर्यवंशीने पाच वर्षांचा असल्यापासून क्रिकेटचे धडे गिरवले. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचं स्वप्न आहे.

वैभव सूर्यवंशी आतापर्यंत 3 आयपीएल सामने खेळला असून त्यात त्याने 4 चौकार आणि 16 षटकार मारत 151 धावा केल्यात.

आयपीएलच्या एका सामन्यासाठी पंचांना किती मानधन मिळतं?