विराटला पछाडत ऋतुराजची सरस कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय

17  नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

इंडिया ए टीमचा ओपनर ऋतुराज गायकवाड याने दक्षिण आफ्रिका ए विरूद्धच्या पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यात शतक आणि अर्धशतक केलं.

ऋतुराजने पहिल्या सामन्यात 12 चौकारांच्या मदतीने 117 धावांची खेळी केली.  तर ऋतुराजने दुसर्‍या सामन्यातही विजयात प्रमुख भूमिका बजावली.

ऋतुराजने दुसऱ्या सामन्यात नाबाद 68 धावा केल्या. ऋतुराज यासह लिस्ट ए क्रिकेटमध्ये नंबर 1 ठरला.

ऋतुराजची  लिस्ट ए क्रिकेटमधील सरासरी यासह 57.80 अशी झाली. ऋतुराज यासह सर्वोत्तम सरासरी असणारा पहिला भारतीय ठरला. 

ऋतुराजआधी चेतेश्वर पुजारा याने 57.01 आणि विराट कोहली याने 56.66 च्या सरासरीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये धावा केल्या आहेत.

ऋतुराज याने दोन्ही सामन्यात चमकदार कामगिरी करत भारताला मालिका जिंकून देण्यात प्रमुख योगदान दिलं. 

टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे.