शुबमन गिलचा शतकी धडका, नोंदवले असे विक्रम

5 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

शुबमन गिलने 129 चेंडूत 9 चौकार 3 षटकार मारत शतकी खेळी केली. पहिल्या डावात शुबमन गिलने 269 धावा केल्या होत्या.

कसोटीच्या दोन्ही डावात  सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज, विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया, यांच्यानंतर शुबमन गिल विरुद्ध इंग्लंड तिसरा कर्णधार ठरला.

विराट कोहलीनंतर कर्णधार म्हणून पहिल्या दोन कसोटीत तीन शतके झळकावणारा गिल हा दुसरा खेळाडू आहे. इतर सात जणांनी प्रत्येकी दोन शतके झळकावली.

एकाच कसोटीत द्विशतक आणि शतक ठोकणारा गिल नववा फलंदाज ठरला. सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज (पोर्ट ऑफ स्पेन) 1971 नंतर भारतासाठी दुसरा फलंदाज ठरला.

1958 मध्ये ब्रिजटाऊन येथे हनीफ मोहम्मद (354: 17 आणि 337) यांच्यानंतर गिल हा उपखंडाबाहेर कसोटीत 350 पेक्षा जास्त धावा करणारा दुसरा आशियाई फलंदाज आहे.

कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक करणारा गिल पहिला भारतीय आणि जगातील दुसरा कर्णधार ठरला. यापूर्वी इंग्लंडच्या ग्रॅहम गूचलाच ही कामगिरी केली आहे.

घरात मनी प्लांट ठेवल्याने काय होतं?