IND vs SA : रवींद्र जडेजा याचा धमाका, दिग्गज कपिल देव यांचा रेकॉर्ड ब्रेक

15  नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

भारताचा अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजाने माजी दिग्गज ऑलराउंडर कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये 4 हजारांपेक्षा अधिक धावा आणि 300 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा चौथा ऑलराउंडर ठरला आहे.

जडेजाच्या आधी इयान बॉथम, कपिल देव आणि डॅनियल व्हीटोरी या 3 माजी ऑलराउंडर खेळाडूंनी अशी कामगिरी केली होती.

इयान बॉथम वेगवान 4 हजार धावा आणि 300 विकेट्स घेणारे पहिले खेळाडू होते. त्यांनी  72 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.

रवींद्र जडेजा सर्वात वेगवान 4 हजार धावा आणि 300 विकेट्स घेणारा दुसरा ऑलराउंडर ठरला आहे.  जडेजाने 88 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.

जडेजाने यासह कपिल देव यांना मागे टाकलं. देव यांनी 97 सामन्यांमध्ये 4 हजार धावा आणि 300 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.

तसेच डॅनियल व्हीटोरीने 101 कसोटी सामन्यांमध्ये 4 हजार पेक्षा अधिक धावा आणि 300 पेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती