14 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून इडन गार्डन्समध्ये खेळवण्यात येत आहे.
भारताने पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेला 159 रन्सवर ऑलआऊट केलं. जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
भारताने त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 37 धावा केल्या.
भारताने यशस्वी जैस्वाल याच्या रुपात एकमेव विकेट गमावली. यशस्वीने 12 धावा केल्या.
वॉशिंग्टन सुंदर 6 तर केएल राहुल 13 धावा करुन नाबाद परतले.
त्यानंतर सामन्यादरम्यान केएल राहुल स्टेडियममधील चाहत्याच्या एका कृतीमुळे वैतागला.
साईड स्क्रीन जवळ एक चाहता फिरत होता. त्यामुळे केएलला बॅटिंग करण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे केएलचा राग अनावर झाला.