16 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात पहिल्या कसोटी सामन्यात भारतावर 30 धावांनी मात केली.
दक्षिण आफ्रिकेने भारताला 124 धावाचं आव्हान दिलं होतं. मात्र भारताचा डाव 93 धावांवरच आटोपला
दक्षिण आफ्रिकेला विजयी करण्यात कर्णधार टेम्बा बावुमा याने निर्णायक भूमिका बजावली.
टेम्बाने दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक आणि नाबाद 55 धावा केल्या.
टेम्बा यासह या पहिल्या कसोटीत 100 चेंडू खेळणारा आणि अर्धशतक करणारा एकमेव फलंदाज ठरला.
टेम्बा बावुमाचा अपवाद वगळता इडन गार्डन्समधील या खेळपट्टीवर दोन्ही संघांचे फलंदाज अपयशी ठरले.
टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने यासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.