5 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
रायपूरमधील दुसऱ्या वनडेत टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं. यासह विराट कोहलीसोबत 2 हजार 462 दिवसांनी काय झालं?
2 हजार 462 दिवसांनंतर पहिल्यांदा असं झालं जेव्हा विराटने शतक केलं आणि भारताचा पराभव झाला.
याआधी अखेरीस 8 मार्च 2019 रोजी विराटच्या शतकानंतर भारताला पराभूत व्हावं लागलं होतं.
विराटने या दरम्यान 17 एकदिवसीय शतकं झळकावली. या सर्व सामन्यात भारताचा विजय झाला होता. मात्र 3 डिसेंबरला ही साखळी तुटली.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विराटसोबत 6 वर्षांत पहिल्यांदा असं झालं जेव्हा त्याने शतक केलं आणि भारत पराभूत झाला.
विराटने रायपूरमध्ये संयमी खेळी करत फटकेबाजी केली. विराटने 93 चेंडूंचा सामना केला.
विराटने या 93 चेंडूत 2 सिक्स आणि 7 फोरसह 102 धावा केल्या.