26 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटीत झालेल्या दुसर्या कसोटीत भारताचा 408 धावांनी धुव्वा उडवला आणि मालिका आपल्या नावावर केली.
दक्षिण आफ्रिकेने यासह भारताला 2-0 ने व्हाईटवॉश केलं. दक्षिण आफ्रिकेने भारतात 25 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकली.
भारताचा कसोटी क्रिकेटमधील धावांच्या हिशोबाने हा सर्वात मोठा पराभव ठरला.याआधी ऑस्ट्रेलियाने भारताला 2004 साली नागपूरमध्ये 342 धावांनी पराभूत केलं होतं.
तसेच दक्षिण आफ्रिकेचा हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. दक्षिण आफ्रिकेने याआधी ऑस्ट्रेलियाला जोहान्सबर्गमध्ये 492 धावांनी पराभूत केलं होतं.
सायमन हार्मर याने भारतातील 4 कसोटींमध्ये 27 विकेट्स घेत माजी गोलंदाज डेल स्टेन याच्या 26 विकेट्सचा रेकॉर्ड ब्रेक केला.
हार्मरने या मालिकेत एकूण 17 विकेट्स मिळवल्या. हार्मरने यासह भारतात दक्षिण आफ्रिकेकडून एका कसोटी मालिकेत डेल स्टेन याच्या सर्वाधिक 15 विकेट्सचा विक्रम मोडीत काढला.
तसेच दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्रक्रम याने एका सामन्यात 9 कॅच घेतल्या. मार्रक्रम याने यासह अजिंक्य रहाणे याचा एका सामन्यात सर्वाधिक 8 कॅच घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.