24 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वाल याने अर्धशतकी खेळी केली.
यशस्वीने 489 धावांच्या प्रत्युत्तरात केएल राहुलसह भारताला अपेक्षित सुरुवात करुन दिली. यशस्वीने 97 बॉलमध्ये 58 रन्स केल्या.
यशस्वीची यासह अनेक महिन्यांची प्रतिक्षा संपली. यशस्वीचं हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं पहिलं अर्धशतक ठरलं.
यशस्वीला याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांतील 6 डावात एकदाही 30 धावाही करता आल्या नव्हत्या.
यशस्वीने WTC स्पर्धेच्या इतिहासात 20 अर्धशतकं झळकावली आहेत.
यशस्वी WTC स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. दिमुथ करुणारत्ने याने 21 अर्धशतकं झळकावली आहेत
यशस्वी आतापर्यंत 28 कसोटी सामन्यांत 6 संघाविरुद्ध खेळला आहे. यशस्वीने या सहाही संघांविरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे.