6 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
केएलने भारताचं मोजक्याच सामन्यात नेतृत्व केलंय. मात्र केएलने यातही रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलाय.
वायझॅगमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. हा सामना भारताने जिंकला.
केएल राहुल याच्या नेतृत्वातील भारताचा हा 15 वा एकदिवसीय सामना होता.
केएलच्या नेतृत्वात भारताने 15 पैकी 11 वेळा प्रतिस्पर्धी संघाला ऑलआऊट केलं आहे. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
हा विक्रम आधी रोहितच्या नावावर होता. रोहितच्या नेतृत्वातील पहिल्या 15 सामन्यांमध्ये भारताने प्रतिस्पर्धी संघांना 10 वेळा ऑलआऊट केलं होतं.
रोहितने जेव्हा ही कामगिरी केली होती तेव्हा त्याने दिग्गज क्लाईव्ह लॉयड यांचा रेकॉर्ड ब्रेक केला होता.
क्लाईव्ह लॉयड यांच्या नेतृत्वातील पहिल्या 15 पैकी 9 सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला ऑलआऊट केलं होतं.