19 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
ऋतुराजने दक्षिण आफ्रिका ए विरूद्ध 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कडक बॅटिंग केली.
ऋतुराजने या 3 सामन्यांच्या मलिकेत 105 च्या सरासरीने एकूण 210 धावा केल्या.
ऋतुराजने या मालिकेत 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावलं. ऋतुराजला त्याच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं.
ऋतुराजने पहिल्या 2 सामन्यात भारताला विजयी करण्यासाठी प्रमुख भूमिका बजावली. ऋतुराज पहिल्या 2 सामन्यात POTM ठरला.
ऋतुराज गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने सर्व फॉर्मेटमध्ये धावा करत आहे. त्यामुळे ऋतुराजला भारतीय संघात पुन्हा एकदा संधी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
ऋतुराज जवळपास गेल्या दीड वर्षांपासून टीममधून बाहेर आहे. ऋतुराजने शेवटचा टी 20I सामना 2024 साली झिंबाब्वे विरुद्ध खेळला होता.
तसेच ऋतुराजला दुखापतीमुळेही टीमपासून दूर रहावं लागलं. ऋतुराजने टीम इंडियाचं 6 वनडे आणि 23 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.