8 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20i मालिकेला 9 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. बुमराहला या मालिकेत खास कामगिरी करण्याची संधी आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचं या मालिकेतून कमबॅक होणार आहे. बुमराहला वनडे सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली होती.
बुमराहला या मालिकेत खास कामगिरी करण्याची संधी आहे. बुमराहआधी कोणत्याच भारतीय गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.
बुमराहला टी 20i क्रिकेटमध्ये 100 विकेट्ससाठी 1 विकेटची गरज आहे. आतापर्यंत भारताकडून अर्शदीप सिंह यानेच टी 20i क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेतल्यात.
बुमराह 1 विकेट घेताच इतिहास घडवेल. बुमराह तिन्ही फॉर्मेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरेल.
बुमराहने आतापर्यंत कसोटीत 234 तर वनडेत 149 विकेट्स घेतल्या आहेत.
बुमराहने टीम इंडियासाठी 80 टी 20i सामन्यांमध्ये 99 विकेट्स घेतल्या आहेत.