2 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत शाहिद आफ्रिदीचा रेकॉर्ड ब्रेक केला. रोहित वनडेत सर्वाधिक सिक्स लगावणारा फलंदाज ठरला.
आता रोहितला ख्रिस गेलचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी फक्त 5 सिक्सची गरज आहे.
रोहितकडे वनडेत ओपनर म्हणून ख्रिस गेल याच्या सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.
गेलने वनडेत ओपनर म्हणून 274 डावांत 328 षटकार लगावलेत. तर रोहितने 188 डावांत 324 सिक्स लगावलेत. त्यामुळे रोहित महारेकॉर्डपासून फक्त 5 सिक्स दूर आहे.
तसेच रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉर्मेटमध्ये 645 षटकार लगावले आहेत. रोहितला 650 सिक्स पूर्ण करण्याची संधी आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना हा 3 डिसेंबरला रायपूरमध्ये होणार आहे.
रोहितने याच सामन्यात 5 षटकार ठोकून हा महारेकॉर्ड आपल्या नावावर करावा, अशी इच्छा चाहत्यांची आहे.