12 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या टी 20I सामन्यात 101 धावांनी मात केली. अर्शदीप सिंह याने या सामन्यात उल्लेखनीय गोलंदाजी केली.
अर्शदीपने 2 ओव्हरमध्ये 17 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. अर्शदीपने क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्स या दोघांना आऊट केलं.
अर्शदीपने क्विंटन डी कॉक याला पहिल्याच ओव्हरमध्ये झिरोवर आऊट केलं.
क्विंटन डी कॉक अर्शदीप सिंह याच्यासमोर टी 20I क्रिकेटमध्ये पुन्हा ढेर झाला. अर्शदीपने डी कॉकला टी 20I मध्ये फक्त 21 बॉलमध्ये चौथ्यांदा आऊट केलं.
क्विंटन डी कॉक याला टी 20I मध्ये अर्शदीपसमोर 21 बॉलमध्ये केवळ 19 धावाच करता आल्या आहेत.
टीम इंडियाने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. भारताने 176 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 74 धावांवर गुंडाळलं.
टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसरा सामना हा गुरुवारी 12 डिसेंबरला होणार आहे.