गुवाहाटी कसोटी ठरणार खास, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 11 वर्षांनंतर असं होणार

21  नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटातील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

भारत या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे.त्यामुळे भारतासमोर अंतिम सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्याचं आव्हान आहे.

दुसऱ्या कसोटीत शुबमन गिल याच्याऐवजी विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत भारताचं नेतृत्व करणार आहे.

शुबमनला कोलकाताील पहिल्या कसोटीत झालेल्या मानेच्या दुखापतीमुळे गुवाहाटीतील सामन्याला मुकावं लागलंय.

ऋषभ कसोटीत भारताचं नेतृत्व करणारा 38 वा खेळाडू ठरणार आहे. तसेच पंत धोनीनंतर कॅप्टन्सी करणारा पहिलाच विकेटकीपर ठरणार आहे.

धोनीने 2008-2014 पर्यंत कसोटीत नेतृत्व केलं होतं. त्यानंतर 11 वर्षांनी विकेटकीपर भारताचं नेतृत्व करणार आहे.

पंतने पहिल्या कसोटीत शुबमनच्या दुखापतीनंतर उर्वरित सामन्यात नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती.