IND vs SA : टीम इंडियाकडे दक्षिण आफ्रिकेचा हिशोब करण्याची संधी?

11 नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला शुक्रवार 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

कसोटी मालिकेतील पहिला सामना हा कोलकातात होणार आहे. दुसर्‍या सामन्याचं आयोजन हे गुवाहाटीत करण्यात आलं आहे.

भारताकडे दोन्ही सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेचा हिशोब बरोबर करण्याची संधी आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचं आयोजन हे कोलकाता करण्यात आलंय. दोन्ही संघांचा हा एकमेकांविरुद्धचा 45 वा कसोटी सामना असणार आहे. 

दक्षिण आफ्रिकेने 44 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर भारताने 16 सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. तर 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.

त्यामुळे टीम इंडियाने या मालिकेतील दोन्ही सामने जिंकल्यास 18-18 अशी दोन्ही संघांनी जिंकलेल्या सामन्यांची बरोबरी होईल.

दरम्यान शुबमनची कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकूण तिसरी कसोटी मालिका असणार आहे.