30 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
दीप्ती शर्माने मंगळवारी 30 डिसेंबरला श्रीलंकेविरुच्या पाचव्या टी 20I सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.
दीप्तीने 4 ओव्हरमध्ये 28 धावा देत 1 विकेट मिळवली. दीप्तीची टी 20I क्रिकेटमधील 152 वी विकेट ठरली.
दीप्तीने यासह टी 20I क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मेगन शूट हीचा सर्वाधिक विकेट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला.
मेगन शूटच्या नावावर टी 20I क्रिकेटमध्ये 151 विकेट्स आहेत. तर आता दीप्ती मेगनच्या पुढे निघाली आहे.
आता दीप्तीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची गरज आहे.
दीप्ती शर्माला त्यासाठी फक्त 22 विकेट्सची गरज आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्सचा विक्रम हा भारताची माजी गोलंदाज झुलन गोस्वामीच्या नावावर आहे.
दीप्तीने आतापर्यंत 334 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. तर झुलन गोस्वामीच्या नावावर 355 विकेट्स आहेत.