रवींद्र जडेजाची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, हरभजन सिंहला पछाडलं 

13 ऑक्टोबर 2025

Created By:  संजय पाटील

जडेजाने विंडीज विरूद्ध दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 102 धावा देत 1 विकेट घेतली. जडेजाने यासह हरभजन सिंह याला मागे टाकलं. 

जडेजाने मायदेशात यासह 377 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केल्या. जडेजाने यासह हरभजनचा रेकॉर्ड ब्रेक केला.

मायदेशात सर्वाधिक 476 विकेट्सचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. तर आर अश्विन  475 विकेट्ससह दुसर्‍या स्थानी आहे.

तर जडेजा आता या यादीत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. तर 376 विकेट्ससह हरभजन सिंहची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

जडेजाने या मालिकेतील 2 सामन्यांमधील 4 डावांमध्ये 8 विकेट्स घेतल्या. तसेच 1 शतकही केलंय. 

जडेजा गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियासाठी सातत्याने बॅटिंग आणि बॉलिंगने चमकदार कामगिरी करतोय.

जडेजाने 2025 वर्षात आतापर्यंत 8 कसोटी सामन्यांमध्ये 82 च्या सरासरीने 659 धावा केल्या आहेत.

जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार 990 धावा केल्या आहेत. जडेजाला 4 हजार धावांसाठी फक्त 10 धावांची गरज आहे. 

श्रीदेवीच्या सावत्र लेकीचा साखरपुडा; आईच्या फोटोसमोर घातली अंगठी