4 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली.
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत पाच सामन्यात दोन्ही सघांनी मिळून 7187 धावा केल्या. कसोटी मालिकेतील ही दुसरी मोठी धावसंख्या आहे.
या मालिकेत दोन्ही संघांनी मिळून 14 वेळा 300 हून अधिक धावा केल्या. या मालिकेत अशी कामगिरी अजून एकदा झाली असती तर वर्ल्ड रेकॉर्ड मोडला असता.
अँडरसन तेंडुलकर मालिकेत नऊ फलंदाजांनी 400 हून अधिक धावा केल्या. हा नवा विक्रम असून पहिल्यांदाच असं घडलं.
दोन्ही संघाच्या खेळाडूंनी 50 वैयक्तिक 50+ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील ही मोठी कामगिरी आहे.
या मालिकेत एकूण 21 शतकं ठोकली गेली. कसोटी मालिकेत सर्वाधिक शतकांच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी केली आहे.
या मालिकेत 19 शतकी भागीदारी झाल्या. कसोटी क्रिकेटमधील संयुक्तपणे सर्वोच्च भागीदारी आहे. ही मालिका फलंदाजांनी गाजवली.