30 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
व्हॉट्सॲप हे मेसेजिंग ॲप जवळपास सर्वच वापरतात. यात अनेक फिचर्स असून वापरकर्त्यांचा त्याचा फायदा होतो.
आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲप चॅट लपवण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत.
तुम्हाला लपवायचे असलेले चॅट न उघडता त्यावर जास्त वेळ प्रेस करा.
जास्त वेळ प्रेस केल्यानंतर तीन बिंदूवर क्लिक करा. तुम्हाला लॉक चॅट पर्याय मिळेल.
चॅट लॉक केल्यानंतर तुम्हाला चॅट लिस्टच्या वरच्या बाजूला लॉक्ड चॅट नावाचं फोल्डर दिसेल. हे फोल्डर तुम्हाला लिस्टमधून गायब करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता.
फोल्डर लपवण्यासाठी प्रथम तुम्हाला लॉक केलेल चॅट फोल्डर उघडावे लागले. उघडल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन ठिपक्यांवर टॅप करा. सेटिंग्जमध्ये हाइड या पर्यायावर क्लिक करा.
तुम्ही हाइड या पर्यायावर क्लिक करताच तुमचे फोल्डर चॅट लिस्टमधून गायब होईल. या फोल्डरसाठी एक सिक्रेट कोड तयार करा. कारण तुम्ही त्या कोडच्या माध्यमातून फोल्डर सर्च करू शकता.