टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील 2026 मधील पहिला सामना केव्हा?

2  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

क्रिकेट चाहत्यांना नववर्षात भारत-पाकिस्तान सामने पाहायला मिळणार आहेत. मात्र कट्टर प्रतिस्पर्धी असलेले हे संघ या वर्षात पहिल्यांदा केव्हा भिडणार?

अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत 2 शेजारी संघ वेगवेगळ्या गटात आहेत. त्यामुळे बाद फेरीतच भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो.

टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही संघ आमनेसामने  येणार हे निश्चित आहे. दोन्ही संघांना एकाच गटात ठेवलंय. त्यामुळे फेब्रुवारीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारीला कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यात साखळीनंतर बाद फेरीतही सामना होऊ शकतो. मात्र त्यासाठी दोन्ही संघ बाद फेरीत पोहचायला हव्यात.

जून 2026 मध्ये वूमन्स टी 20I वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत.

या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघातील हा हायव्होल्टेज सामना 14 जूनला इंग्लंडमध्ये होणार आहे.