21 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
आशिया कप 2025 स्पर्धेचा थरार 9 ते 29 सप्टेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.
यंदा आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होत आहे. सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे.
आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्फोटक फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. मात्र सू्र्यावर अधिकची जबाबदारी असणार आहे.
टी 20I मध्ये सूर्याने माजी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना मागे टाकलं आहे.
भारतीय टी 20I संघात कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव हायेस्ट स्ट्राईक रेटने धावा करणारा फलंदाज आहे.
कॅप्टन सूर्याने 21 डावात 163.15 च्या स्ट्राईक रेटने 558 धावा केल्या आहेत, ज्या सर्वाधिक आहेत.
रोहित शर्माचा टी 20I मध्ये कॅप्टन म्हणून 149.8 असा स्ट्राईक रेट होता. तर विराटचा स्ट्राईक रेट हा 140.6 असा होता.