IPL 2025 Final : पंजाब आणि आरसीबीपैकी अहमदाबादमध्ये सरस कोण?

2 जून 2025

Created By:  संजय पाटील

आयपीएल 2025 महाअंतिम सामन्यात आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. 3 जून रोजी हा सामना होणार आहे.

हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या निमित्ताने दोन्ही संघांची या मैदानातील आकडेवारी जाणून घेऊयात.

पंजाब किंग्सने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 7 सामने खेळले आहेत. 

पंजाब किंग्सने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तसेच पंजाबला 2 वेळा पराभवाची चव चाखावी लागली आहे. पंजाबचा या मैदानात 1 सामना टायही झालाय. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 6 सामने खेळले आहेत. आरसीबीची या मैदानातील कामगिरी 50-50 अशी राहिलीय.

आरसीबीने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीला तेवढ्याच सामन्यात पराभूत व्हावं लागलंय.

आता मंगळवारी 3 जून रोजी अहमदाबादमध्ये कोणता संघ 18 वर्षांची प्रतिक्षा संपवणार? याची उत्सूकता चाहत्यांना लागून आहे.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या