रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीचा महारेकॉर्ड
23 मे 2025
Created By: संजय पाटील
विराट कोहलीने आयपीएल स्पर्धेत इतिहास घ़डवला आहे. विराटने 18 व्या मोसमात मोठा कारनामा केला आहे.
विराट कोहलीने सनरायजर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात 25 बॉलमध्ये 43 धावा केल्या.
विराट कोहलीने या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. विराटने चौकार आणि षटकाराच्या मदतीने 8 बॉलमध्ये 34 रन्स केल्या.
विराटने 7 चौकारांसह मोठा विक्रम त्याच्या नावावर केला. विराटने आरसीबीसाठी आयपीएलमध्ये 800 चौकार पूर्ण केले आहेत.
विराट यासह टी 20 क्रिकेटमध्ये एका टीमकडून सर्वाधिक चौकार लगावणारा पहिला फलंदाज ठरला.
विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीपासून अर्थात 2008 पासून आरसीबी या टीमकडूनच खेळत आहे.
विराटने आतापर्यंत आयपीएल कारकीर्दीत 264 सामन्यांमध्ये 8 शतकं आणि 62 अर्धशतकांसह 8 हजार 552 धावा केल्या आहेत.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा