आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा महारेकॉर्ड

30  मे 2025

Created By:  संजय पाटील

रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुने लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरात पराभूत केलं. उभयसंघात 27 मे रोजी हा सामना खेळवण्यात आला.

आरसीबीने या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासातील तिसऱ्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आणि विजय मिळवला.

आरसीबीने जितेश शर्मा याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. जितेश शर्मा हा आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरला.

आरसीबीने 8 बॉलआधी 228 धावांचा यशस्वी पाठलाग केला. आरसीबीने या विजयासह क्वालिफायर 1 मध्ये प्रवेश केला होता.

आरसीबी या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत घराबाहेरील सर्व सामने जिंकणारी पहिली टीम ठरली.

आरसीबीने या हंगामातील साखळी फेरीतील 14 पैकी 7 सामने हे दुसऱ्या संघाच्या होम ग्राउंडमध्ये जिंकले आणि महारेकॉर्ड केला.

आरसीबीने क्वालिफायर 1 मध्ये पंजाबवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आरसीबीची फायनलमध्ये पोहचण्याची ही 2016 नंतरची पहिली वेळ

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या