विराट कोहली आणखी एक रेकॉर्डच्या उंबरठ्यावर, नक्की काय?

17 मे 2025

Created By:  संजय पाटील

भारत-पाकिस्तान तणावानंतर IPL च्या 18 व्या हंगामाला 17 मे पासून पुन्हा सुरुवात झालीय, आरसीबी-केकेआर सामना पावसामुळे रद्द

विराटला आता 23 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मोठा विक्रम करण्याची संधी

विराटने आयपीएलच्या 18 व्या मोसमात आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे

विराटला हैदराबाद विरुद्ध एक चौकारची गरज, यासह विराटच्या नावावर आयपीएलमध्ये 750 चौकारांची नोंद होईल, सध्या त्याच्या नावावर 263 सामन्यांमध्ये 749 चौकार

विराट असं करताच 750 चौकार लगावणारा पहिला सक्रीय आणि शिखर धवननंतर दुसरा फलंदाज ठरणार, धवनच्या नावे 768 चौकार

विराटने या हंगामातील 11 सामन्यांमध्ये 63.13 च्या सरासरीने 505 धावा केल्या आहेत, यात  7 अर्धशतकांचा समावेश

विराट ऑरेंज कॅपच्या शर्यतीत, विराट या शर्यतीत चौथ्या स्थानी

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या