व्हॉट टायमिंग भाऊ, सूर्याकडून जितेशचं तोंडभरुन कौतुक
27 मे 2025
Created By: संजय पाटील
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनौ सुपर जायंट्सवर 6 विकेट्स शानदार विजय मिळवला.
आरसीबीने या विजयासह टॉप 2 मध्ये धडक दिली. कर्णधार जितेश शर्मा आरसीबीच्या विजयाचा नायक ठरला.
जितेश शर्मा याने आरसीबीसाठी सर्वाधिक धावा केल्या. जितेशने नाबाद 85 रन्स केल्या.
आरसीबीच्या विजयानंतर मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार याने जितेशचं या खेळीसाठी कौतुक केलं आहे.
सूर्यकुमार यादव याने जितेशचं इंस्टा स्टोरीद्वारे कौतुक केलंय. सूर्याने इंस्टा स्टोरीत जितेशचा फोटो पोस्ट केला आहे.
चांगल्या लोकांसोबत चांगलंच होतं, व्हॉट टायमिंग भाऊ, असं सूर्यकुमारने त्याच्या इंस्टा स्टोरीत म्हटलंय.
दरम्यान आता आरसीबी क्वालिफायर 1 मध्ये 29 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध भिडणार आहे.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा