5 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
आयपीएल 2026 साठी 16 डिसेंबरला अबुधाबीत ऑक्शन होणार आहे. यासाठी 1355 खेळाडूंनी नावं नोंदवली आहेत.
आपली निवड व्हावी आणि खेळण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. मात्र 5 खेळाडूंची तशी इच्छा नाही.
क्रिकबझनुसार, 5 विदेशी खेळाडूंनी बीसीसीआयला ऑक्शनआधीच ते किती सामने खेळण्यासाठी उपलब्ध असणार? हे सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर बॅट्समन जोश इंग्लिंस फक्त 4 सामन्यांसाठीच उपलब्ध असणार आहे.
तसेच न्यूझीलंडचा खेळाडू एडन मिल्ने 95 टक्के सामने म्हणजे 12-13 मॅचेससाठी उपलब्ध असणार आहे.
रायली रुसो 3 सामने खेळू शकतो. रायली रुसो याने आयपीएलमध्ये दिल्ली आणि पंजाबचं प्रतिनिधित्व केलं आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू एश्टन एगर 8-9 तर विल सदरलँड 10-11 सामन्यांसाठी उपलब्ध असू शकतो.