ईशान किशनसोबत त्याच्या IPL च्या 10 वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच असं झालं

25  मे 2025

Created By:  संजय पाटील

IPL 2025 मधील 65 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने आरसीबीवर विजय मिळवला.  ईशान किशन या विजयाचा हिरो ठरला. 

ईशान किशन याने आरसीबी विरुद्ध 195.83 च्या स्ट्राईक रेटने 48 बॉलमध्ये 94 रन्स केल्या. ईशानने या खेळीत  7 चौकार आणि 5 षटकार लगावले.

ईशान किशनच्या खेळीमुळे हैदराबादला 42 धावांनी विजय मिळवता आला. ईशानला त्याच्या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. 

ईशानला याआधी 18 व्या हंगामात मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. ईशानने तेव्हा राजस्थान विरुद्ध शतक केलं होतं.

ईशान किशन अशाप्रकारे एकूण 2 वेळा या हंगामात POTM ठरला. ईशानसह त्याच्या आयपीएलच्या 10 वर्षांच्या कारकीर्दीत असं पहिल्यांदाच झालं.

ईशान किशन याच्यासाठी 18 वा मोसम शानदार असा राहिला. ईशानने याआधीच्या 3 हंगामात प्रत्येकी 1-1 वेळाच POTM पुरस्कार जिंकला होता.

ईशान किशन याने 18 व्या मोसमातील 13 सामन्यांमध्ये 36.11 च्या सरासरीने 325 धावा केल्या. ईशानने 153.30 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. 

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या