फुटकं नशिब! 199 धावांवर धावचीत होणारा एकमेव खेळाडू कोण? जाणून घ्या

6 सप्टेंबर 2025

Created By:  राकेश ठाकुर

दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत साउथ झोनचा ओपनर एन जगदीसनने शतकी खेळी केली. 

एन जगदीसन द्वीशतकाच्या जवळ पोहोचला होता. पण 197 धावांवर धावचीत झाला आणि तंबूत परतला.

जगदीसन धावचीत झाल्याने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वातील त्या घटनेची आठवण झाली. कारण अवघ्या एका धावेने द्विशतक हुकलं होतं. 

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज युनिस खानचं द्विशतक अवघ्या 1 धावेने हुकलं होतं. भारताविरूद्धच्या सामन्यात 199 वर बाद झाला होता. 

कसोटी क्रिकेटमध्ये 199 या धावसंख्येवर एकूण 12 फलंदाज बाद झाले आहेत. पण युनिस एकमेव फलंदाज असा आहे की धावचीत झाला. 

भारत पाकिस्तान यांच्यात 2006 मध्ये लाहोर टेस्टच्या पहिल्या डावात युनिस खान द्विशतकासाठी धाव घेताना बाद झाला. 

हरभजनने केलेल्या थ्रोमुळे युनिस खानचं द्विशतक हुकलं. त्यामुळे भारताविरुद्ध दुसरं द्विशतक ठोकण्याचा मान गमावला.

आशिया कप स्पर्धेपूर्वी गोलंदाजाने रचला इतिहास, केलं असं की...