11 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
जसप्रीत बुमराहने तिसऱ्या कसोटीत शानदार गोलंदाजी केली आणि पाच विकेट्स घेतल्या.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 27 षटकं टाकली आणि 74 धावा देऊन पाच बळी घेतले.
विदेशात कसोटी सामन्यात सर्वाधिक पाच बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.त्याने महान कपिल देवचा विक्रम मोडला आहे.
बुमराहने आतापर्यंत विदेशातील कसोटी सामन्यात 13 वेळा पाच बळी घेतले आहेत. तर कपिलने 12 वेळा ही कामगिरी केली आहे.
विदेशी भूमीवर कसोटी सामन्यात पाच बळी घेण्यात बुमराहने सर्व भारतीय गोलंदाजांना मागे टाकले आहे. तसेच अव्वल स्थान गाठलं आहे.
जसप्रीत बुमराहने 2018 मध्ये भारतीय कसोटी संघासाठी कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून भारतीय संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे.
टीम इंडियासाठी 47 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 215 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्याने 15 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.