11 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
कावीळ हा आजार नाही तर एक लक्षण आहे. यात शरीरातील बिलीरुबिन नावाच्या रंगद्रव्याचे प्रमाण वाढते. त्याचा परिणाम त्वचा,डोळे आणि लघवीच्या रंगावर दिसून येतो.
जेव्हा यकृत व्यवस्थित काम करत नाही त्यावेळी शरीरात बिलीरुबिनचे प्रमाण वाढतं. याला व्हायरल हेपेटायटीस, जास्त मद्यपान, यकृताची जळजळ, पित्त नळीकेत अडथळा किंवा रक्ताशी निगडीत आजार असू शकतो.
डॉ. रोहित कपूर यांच्या मते, कावीळ होण्याचं पहिलं लक्षण म्हणजे डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा पडणे. यावरून शरीरात बिलीरुबिन वाढल्याचं कळतं.
कावीळ झाल्यावर लघवीचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी होऊ शकतो. कारण शरीरातील बिलीरुबिन लघवीद्वारे बाहेर पडते.
यकृताच्या कमकुवतपणामुळे शरीराच्या उर्जेवर परिणाम होतो. त्यामुळे सतत थकवा, आळस किंवा एकाग्रतेचा अभाव जाणवतो.
कावीळ झाल्यावर व्यक्तीची भूक मंदावते, मळमळ होते, उलट्या होतात. ही लक्षणं यकृताच्या कार्यात अडथळा दर्शवतात.
बऱ्याचदा हलका ताप आणि पोटाच्या उजव्या बाजूला सौम्य वेदना जाणवतात. ही देखील कावीळची सुरुवातीची लक्षणे आहेत.