जो रुटने तिघांना पछाडलं, सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात!

25 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने पुन्हा एकदा धमाका केला आहे.

जो रुट याने कसोटीत सर्वाधिक धावांबाबत राहुल द्रविड याला पछाडलं आहे.

'द वॉल' अर्थात राहुल द्रविड याने कसोटी क्रिकेटमध्ये 13 हजार 288 धावा केल्या होत्या. रुटने द्रविडला मागे टाकलं आहे.

जो रुट याने द्रविड व्यतिरिक्त जॅक कॅलिस आणि रिकी पॉन्टिंग या दोघांनाही पछाडलं आहे. कॅलिसने कसोटीत 13 हजार 289 तर पॉन्टिंगने 13378 धावा केल्या आहेत.

जो रुट आता कसोटीत सर्वाधिक धावांबाबत दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. पहिल्या स्थानी सचिन आहे. सचिनने सर्वाधिक 15 हजार 921 धावा केल्या आहेत.

जो रुट याला सचिनच्या सर्वाधिक कसोटी धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. रुट सध्या 33 वर्षांचा आहे.

रुटने कसोटीत 67 अर्धशतकं झळकावली आहेत. तर सर्वाधिक 68 अर्धशतकं सचिनच्या नावावर आहेत.

डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या इतिहासात ऋषभ पंत याच्या नावावर 73 षटकारांची नोंद आहे. 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या