कसोटी मालिकेदरम्यान करुण नायरचा मोठा निर्णय, टीमच बदलली 

20 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

टीम इंडियाचा फलंदाज करुण नायर याला आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत काही खास करता आलेलं नाही.

करुण नायर याने 6 डावांत 21.83 च्या सरासरीने  131 धावा केल्या आहेत. करुणचा या सीरिजमधील हायस्कोअर 40 आहे.

करुणला इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून डच्चू दिला जाऊ शकतो. त्याआधी करुणबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

करुण नायर आगामी देशांतर्गत हंगामात (2025-2026)  माजी संघ कर्नाटककडून खेळताना दिसणार आहे.

करुणला 2022 मध्ये कर्नाटक टीममधून बाहेर करण्यात आलं. करुणने त्यानंतर 2023 आणि 2024 च्या हंगामात विदर्भाचं प्रतिनिधित्व केलं. 

रिपोर्ट्सनुसार, करुणने वैयक्तिक कारणांमुळे कर्नाटककडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

करुणनने गेल्या हंगामात रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भासाठी 863 धावा केल्या. करुणला याच जोरावर  अनेक वर्षांनंतर भारतीय संघात संधी देण्यात आली

टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?