28 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
आशिया कप स्पर्धेआधी विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने केरळ क्रिकेट लीग स्पर्धेत षटकारांचा पाऊस पाडला आहे.
संजू सॅमसन याने केसीएल 2025 मध्ये सलग तिसऱ्यांदा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
संजूने गेल्या 3 डावात एकदा शतक आणि 2 वेळा अर्धशतक केलंय. संजूने अनुक्रमे 121, 89 आणि 62 धावा केल्या.
संजूने केरळ क्रिकेट लीग 2025 स्पर्धेतील गेल्या 3 सामन्यांमध्ये एकूण 21 षटकार लगावले.
संजूने केरळ क्रिकेट लीग स्पर्धेतील 3 सामन्यात ओपनर म्हणून खेळताना 90.66 च्या सरासरीने 272 धावा केल्या आहेत.
संजू सॅमसन याचा स्ट्राईक रेट हा 200 पेक्षा जास्त आहे. संजूने 202 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
संजूच्या या खेळीमुळे आशिया कपआधी टीम मॅनेजमेंटची डोकेदुखी वाढली आहे. संजूला या कामगिरीमुळे आशिया कप स्पर्धेसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी द्यावी लागणार आहे.
शुबमन गिलच्या कमबॅकमुळे संजूला ओपनिंगऐवजी मिडल ऑर्डरमध्ये खेळावं लागणार असल्याची चर्चा होती. मात्र संजूने आपण ओपनर म्हणून काय करु शकतो? हे दाखवून दिलंय.