कॅप्टन केएल भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुन्हा वनडे सीरिज जिंकवणार?

28 नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

शुबमन गिल याला झालेल्या दुखापतीमुळे केएल राहुल एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.

केएल राहुलची भारताचं नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ नाही. केएलने याआधीही भारताचं नेतृत्व केलं आहे.

केएलच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 

भारताने त्यापैकी 8 सामने जिंकले आहेत. तर 4 वेळा भारताला पराभूत व्हावं लागलंय.

केएलने अखेरीस 2023 मध्ये वनडेत टीम इंडियाचं नेतृत्व केलेलं. तेव्हा केएलने भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच 2-1 ने जिंकवलं होतं. 

त्यामुळे आता केएल राहुल पुन्हा एकदा भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकून देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.