28 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
टीम इंडियाचा ओपनर केएल राहुलची नजर आता आणखी एका विक्रमावर आहे.
केएल राहुलच्या रडारवर सुनील गावस्कर यांचा विक्रम आहे. हा विक्रम त्यांनी इंग्लंडच्या भूमीवर रचला होता.
केएल राहुलने ओवल कसोटीत 43 धावा करताच इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा आशियाई ओपनर ठरेल.
सुनील गावस्कर यांनी इंग्लंडमध्ये ओपनर म्हणून 28 डावात 1152 धावा केल्या आहेत. केएल राहुलने 24 डावात 1108 धावा केल्या आहेत.
केएल राहुलसाठी इंग्लंडची मालिका जबरदस्त राहिली आहे. त्याने चार सामन्यात 511 धावा केल्या आहेत.
केएल राहुलने या मालिकेत 2 शतकं आणि 2 अर्धशतकं ठोकली आहेत.
केएल राहुलच्या करिअरमधील बेस्ट कसोटी सीरिज ाहे. यात त्याने पहिल्यांदाच 400 हून अधिक धावा केल्या आहेत.