28 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
आयफोनचा नवीन सीरिज 17 लवकरच लाँच होणार आहे. चला जाणून घेऊयात याबाबतच्या डिटेल्स
अॅपल कंपनीचा अपकमिंग आयफोन 17 सीरिज सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे.
ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनने याबाबतचे संकेत दिले आहेत. आयफोन 17 सीरिज 9 किंवा 10 सप्टेंबरला लाँच होऊ शकतो.
मार्क गुरमनच्या मते, आयफोन 17 सीरिजची प्री बुकिंग 12 सप्टेंबरपासून सुरु होईल.
ईटी रिपोर्टमध्ये मार्क गुरमनच्या माहितीनुसार सांगितलं की, आयफोन 17 सीरिजची जागतिक पातळीवर विक्री 19 सप्टेंबरपासून सुरु होऊ शकते. भारताच्या तारखेबाबत सध्या तरी काही माहिती नाही.
लीक्सच्या मते, प्रो मॉडेलची भारतात किंमत 1 लाख 45 हजार रुपयांपासून सुरु होऊ शकते.
आयफोन 17, स्लीम आयफोन 17 एअर, आयफोन प्रो आणि आयफोन प्रो मॅक्स लाँच होऊ शकते. प्लस व्हेरिएंटची जागा एअर व्हेरिएंट घेऊ शकतो.