केएलचं लॉर्ड्समध्ये ऐतिहासिक शतक, मोहम्मद अझरुद्दीनचा रेकॉर्ड ब्रेक

13 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

केएलने इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 100 धावा केल्या. केएलचं हे कसोटीतील 10 वं शतक ठरलं.

केएलने या खेळीत 177 चेंडूंचा सामना केला. तसेच 13 चौकार लगावले. 

केएलचं लॉर्ड्समधील सलग आणि एकूण दुसरं शतक ठरलं. केएलने याआधी 2021 मध्ये याच मैदानात शतक केलं होतं. 

केएलने या शतकासह माजी फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकलं आहे.

केएल अझरुद्दीनला पछाडत सेना देशात भारतासाठी 7 शतक करणारा पाचवा बॅट्समन ठरला. अझरुद्दीनच्या नावावर 6 शतकं आहेत.

सेना देशात टीम इंडियासाठी सर्वाधिक शतकांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. 

सचिन तेंडुलकरने कसोटी कारकीर्दीत टीम इंडियासाठी सेना देशात सर्वाधिक 17 शतकं ठोकली आहेत.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या