दिसण्यात हिट, मैदानात सुपरहिट, स्टार बॉलर लॉरेन बेल हीचा मोठा रेकॉर्ड

16 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

द हंड्रेड 2025 स्पर्धेतील15 व्या सामन्यात सदर्न ब्रेव्ह संघाची वेगवान गोलंदाज लॉरेन बेल हीने ट्रेंट रॉकेट्स विरुद्ध चाबूक कामगिरी करत मोठा विक्रम आपल्या नावे केला. 

लॉरेनने या सामन्यात 20 बॉलमध्ये फक्त 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. लॉरेनने 20 पैकी 11 डॉट बॉल टाकले. 

लॉरेनने एशले गार्डनर हीला आऊट करत मोठा विक्रम केला. लॉरेनने द हंड्रेड स्पर्धेत विकेट्सचं अर्धशतक पूर्ण केलं.

लॉरेनने या विकेट्ससह इतिहास घडवला. लॉरेन द हंड्रेड स्पर्धेत 50 विकेट्स घेणारी पहिली गोलंदाज ठरली. 

लॉरेन बेल हीने या स्पर्धेत आतापर्यंत 36 सामन्यांमध्ये 7.15 च्या इकॉनमीने 51 विकेट्स घेतल्या. तसेच लॉरेनने या हंगामातील 4 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या.

लॉरेनची गणना क्रिकेट विश्वातील सुंदर महिला खेळाडूंमध्ये केली जाते. लॉरेन इंग्लंडचं तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व करते.

लॉरेनने आतापर्यंत इंग्लंडचं 5 कसोटी, 24 वनडे आणि 36 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.  लॉरेनने या दरम्यान एकूण 106 विकेट्स घेतल्या आहेत.

अनाया बांगर दिसणार नव्या भूमिकेत, अखेर घेतला मोठा निर्णय