आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 150 विकेट्स, हर्षल पटेलने घडवला इतिहास

19  मे 2025

Created By:  संजय पाटील

हर्षल पटेल याने आयपीएल 2025 मध्ये लखनौ विरुद्ध मोठा कारनामा केला. हर्षल अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.

हर्षल पटेल याने लखनौ विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 49 धावा लुटवल्या. मात्र हर्षलची एकमेव विकेट खास ठरली. 

हर्षल पटेल याने एडन मारक्रम याला आऊट केलं. हर्षलने यासह आयपीएल कारकीर्दीत एकूण 150 विकेट्स पूर्ण केल्या.

हर्षल पटेल आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत 150 विकेट्स घेतल्या. हर्षलने याबाबतीत लसिथ मलिंगाचा रेकॉर्ड ब्रेक केला.

हर्षलने 2381 बॉलमध्ये 150 विकेट्स घेतल्या. तर लसिथ मलिंगा याने 1 हजार 444 चेंडूत 150 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.

हर्षल डावांच्या हिशोबाने वेगवान 150 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे.  हर्षलने 114 डावात ही कामगिरी केलीय. तर मलिंगाने 105 इनिंग्समध्ये 150 विकेट्स घेतल्या होत्या.

हर्षलने 2012 साली आयपीएल पदार्पण केलं होतं. हर्षलने 2021 साली सर्वाधिक 32 विकेट्स घेतल्या होत्या. हर्षल त्या मोसमात पर्पल कॅप पटकावली होती.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या