महेंद्रसिंह धोनीच्या हेअरस्टाईलची रंगली चर्चा, पाहा नवा लूक

महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा नव्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आला आहे. 

कॅप्टन कूल धोनीचा नवा लूक फेमस हेअरस्टायलिश आलिम हाकिमने केला आहे. 

आलिमने धोनीच्या नव्या लूकचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

आलिमने सांगितले की, 'या आयपीएलपूर्वी त्याच्या केसांना कित्येकदा नवा लूक दिला. मी त्याच्या लांब केसांचा फॅन आहे.'

'मला माही भाईची हेअर स्टाईल बनवण्यास मजा आली. जाहीरात शूटच्या आधीचे फोटो आहेत.'

धोनीच्या हेअरस्टाईलवर अभिनेता अनिल कपूर, रणवीर सिंहसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी कमेंट्स दिल्या आहेत. 

धोनीने सर्व फॉर्मेटमधील 538 सामन्यात 195 स्टम्पिंग केले आहेत. एकूण 829 विकेट घेतले आहेत.