जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड ब्रेक, सिराज इंग्लंडमध्ये ठरला नंबर 1 बॉलर

1 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने पाचव्या कसोटीतही तडाखा कायम ठेवला आहे.

सिराजने ओव्हलमध्ये आयोजित सामन्यातील पहिल्या डावात एकूण 4 विकेट्स घेतल्या.

सिराज यासह इंडिया-इंग्लंड या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरलाय. 

सिराजने 8 डावांत 18 विकेट्स घेत पहिल्या स्थानी झेप घेतली. सिराजची या मालिकेत 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची दुसरी वेळ ठरली. 

सिराजने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला मागे टाकलं. स्टोक्सने 4 सामन्यांमधील 8 डावांत 17 विकेट्स घेतल्यात.

तसेच मोहम्मद सिराज जसप्रीत बुमराह याला पछाडत  इंग्लंडमध्ये 6 वेळा 4 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

सिराजने या मालिकेत बुमराहशिवाय खेळताना 3 डावांत 19.36 च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या.

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या