6 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
फोटो- बीसीसीआय
दहा कसोटी सामन्यांमध्ये मोहम्मद सिराजने टीम इंडियासाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत 5 सामन्यांमध्ये 20 विकेट्स घेतल्या होत्या.
सिराजने आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पाच सामन्यांमध्ये 23 विकेट्स घेत चमक दाखवली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मोहम्मद सिराजने 5 विकेट घेत टीम इंडियाला रोमांचक विजय मिळवून दिला.
मोहम्मद सिराजला सामनावीर पुरस्कार मिळाला. या पुरस्कारासोबतच, सिराजला बीसीसीआयकडून एक विशेष बोनस देखील मिळेल.
टीम इंडियाच्या गोलंदाजाने एका कसोटीत 5 बळी घेतले तर त्याला 5 लाख रुपये बक्षीस दिले जाते.
टीम इंडियाकडून कसोटी खेळणाऱ्या खेळाडूला प्रति सामना 15 लाख रुपये दिले जातात. पाच सामन्यासाठी 75 लाख रुपये मिळतील.
अँडरसन-तेंडुलकर मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या सिराजने एकाच मालिकेतून 80 लाख रुपये कमावले आहेत.