मोहम्मद सिराजची ऐतिहासिक कामगिरी, ठरला तिसराच भारतीय गोलंदाज
1 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
मोहम्मद सिराज याने ओव्हलमध्ये पाचव्या कसोटीतील पहिल्या डावात अप्रतिम बॉलिंग केली. सिराजने यासह खास रेकॉर्ड आपल्या नावे केला.
सिराजने पहिल्या डावात दुसरी विकेट घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या.
सिराजने आतापर्यंत कसोटीत 116, वनडेत 71 आणि टी 20I मध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत.
सिराजने अनेकदा निर्णायक क्षणी विकेट्स घेत भारताला एकहाती सामने जिंकून दिलेत. त्यामुळे त्याला सातत्याने संधी दिली जाते.
सिराज विदेशात 3 संघांविरुद्ध प्रत्येकी 5-5 सामन्यांची कसोटी मालिका खेळला आहे. विशेष म्हणजे या प्रत्येक सामन्यात तो प्लेइंग ईलेव्हनमध्ये होता. हा एक विक्रम आहे.
सिराज विदेशात 3 संघांविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याआधी कपिल देव आणि विनू मांकड यांनी अशी कामगिरी केली होती.
मोहम्मद सिराज याने 2017 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. तर सिराजला 2020 साली कसोटी पदार्पणाची संधी मिळाली.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या