रवी शास्त्री यांना पु्न्हा प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळणार?

24  डिसेंबर  2025

Created By:  संजय पाटील

इंग्लंडची सध्या वाईट वेळ सुरु आहे. इंग्लंड मायदेशात भारताविरुद्ध मालिका जिंकण्यात अपयशी ठरली. त्यानंतर 11 दिवसात एशेज सीरिज गमावली.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा एशेज सीरिजमधील पहिल्या सलग 3 सामन्यांत धुव्वा उडवला. इंग्लंडसमोर उर्वरित 2 सामन्यांत कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. 

इंग्लंडच्या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी खेळाडू हेड कोच ब्रँडन मॅक्युलमला हटवण्याची मागणी करत आहे. 

मॅक्युलमला हटवल्यानंतर हेड कोच कोण असणार? माजी खेळाडू मान्टी पानेसर यांनी रवी शास्त्री यांच्या नावाची शिफारस केली आहे. 

ब्रँडन मॅक्युलम याला हटवल्यानंतर रवी शास्त्री यांना हेड कोच करावं, असं पानेसर यांनी म्हटलं.

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात कसं पराभूत करायचं हे शास्त्रींना माहितीय. त्यांच्याच मार्गदर्शनात भारताने कांगारुंना घरात दोनदा पराभूत केलंय, असं पानेसरने म्हटलं

शास्त्रींना भारताचे हेड कोच असताना वार्षिक 10 कोटी रुपये मानधन मिळायचे. तसेच इंग्लंडचे हेड कोच झाल्यास ते पगाराबाबत सर्वात महागडे प्रशिक्षक ठरतील.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याला बीसीसीआयकडून वार्षिक 14 कोटी रुपये वेतन मिळतं.