25 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
टी 20 क्रिकेट म्हणजे बॅट्समन गेम असं म्हटलं जातं. या फॉर्मेटमध्ये गोलंदाजांची धुलाई होते. मात्र काही चिवट गोलंदाज आहेत जे सहजासहजी धावा देत नाहीत.
टी 20 फॉर्मेटमध्ये एका गोलंदाजाला जास्तीत जास्त 4 षटकं टाकता येतात. त्यातही निर्धाव चेंडू टाकणं खरंच उल्लेखनीय बाब आहे. अशा 5 गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात.
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम हा सुनील नारायण याच्या नावावर आहे. सुनीलने 546 डावांत 31 निर्धाव चेंडू टाकले आहेत.
शाकिब अल हसन याने 447 डावांत 27 वेळा निर्धाव चेंडू टाकले आहेत. शाकिब या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
भारताचा भुवनेश्वर कुमार या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.भुवीने 308 डावात 26 डॉट बॉल टाकले आहेत.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने 326 डावांत 26 निर्धाव चेंडू टाकले आहेत.
जसप्रीत बुमराह याने 244 डावात 22 वेळा निर्धाव चेंडू टाकले आहेत. बुमराह सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा दुसरा भारतीय गोलंदाज आहे.